Ad will apear here
Next
‘रीडिंग वॉल’वर मोफत आस्वाद घ्या अमूल्य साहित्याचा!
पुणे : एका अभूतपूर्व संकटामुळे निर्माण झालेल्या संक्रमणकाळाचा अनुभव सध्या सारे जग घेत आहे. या कठीण काळातून तरण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करतो आहे. जगण्याची ही धडपड सुकर करण्याचे, तिला दिशा दाखवण्याचे काम करतात चांगले विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन. पुस्तके हा या दोन्हींचा मुख्य स्रोत आहे. म्हणूनच, ‘रीडिंग वॉल’च्या माध्यमातून विविध विषयांवरचे दर्जेदार साहित्य मोबाइलवर मोफत उपलब्ध करण्याचा उपक्रम बुकगंगा पब्लिकेशन्सने राबविला आहे. या व्यतिरिक्त जगभरातील लेखकांना स्वतःचे लेखनही या ‘वॉल’वर प्रसिद्ध करता येणार आहे.

कठीण काळात चांगली पुस्तके खऱ्या सोबत्याचे नाते निभावतात आणि ते नाते तयार करण्याचे सगळे श्रेय असते अर्थातच लेखकांचे. हे नाते दृढ करण्यासाठी बुकगंगा प्रकाशनाच्या लेखकांचे दर्जेदार साहित्य मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. https://www.readingwall.com/main/ebooks या लिंकवर ते उपलब्ध आहे. मानसिक-शारीरिक आरोग्यविषयक, कथा, कविता, कादंबरी, ललित, लहान मुलांसाठीच्या गोष्टी अशा विविध विषयांवरचे मराठी साहित्य या रीडिंग वॉलवर मोफत उपलब्ध आहे. साहित्याचा हा खजिना प्रत्येकाला या कठीण परिस्थितीत बळ देईल, अशी आशा बुकगंगा पब्लिकेशन्सने व्यक्त केली आहे. (पुस्तकांची यादी बातमीच्या शेवटी दिली आहे.)

मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप अशा कोणत्याही गॅजेटवर हा खजिना उपलब्ध आहे. ही पुस्तके घरातील सर्वांना वाचता येतील, लहान मुलांना, घरातल्या वयस्कर व्यक्तींना वाचून दाखवता येतील आणि वाचनाचा एकत्रित आनंद घेता येईल. करोनाच्या या संकटामुळे अगणित वाईट गोष्टी घडल्या आणि घडतही आहेत; पण त्यातून एक चांगली गोष्ट घडते आहे, ती म्हणजे या संकटामुळे माणसे शरीराने दूर असली, तरी मनाने जवळ येत आहेत. नात्यांचे हे बंध अधिक दृढ करण्याचे काम साहित्याचा हा खजिना करू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच ‘रीडिंग वॉल’ची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन ‘बुकगंगा’तर्फे करण्यात आले आहे.

तुम्हीही येथे लेखन करू शकता...
या पुस्तकांव्यतिरिक्त प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षकथा, कविता, पाककृती, आहार, पोषण, पर्यावरण, ललित अशा विविध विषयांवर नामवंत लेखकांनी केलेले दर्जेदार लेखन या रीडिंग वॉलवर उपलब्ध आहे. तसेच, यावर अकाउंट तयार करून जगभरातील कोणीही लेखक त्याचे साहित्य या वॉलवर प्रसिद्ध करू शकतो. तसेच, त्याचे आधीचे लेखनही येथे पोस्ट करू शकतो. त्यामुळे त्या लेखकांचा वाचकवर्ग वाढण्यास मदत होईल आणि वाचकांना अधिकाधिक चांगले साहित्य उपलब्ध होत जाईल.

सध्या या वॉलवर मराठी भाषेतील विपुल साहित्य उपलब्ध आहे. येत्या काळात इंग्लिश, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, तमिळ, तेलुगू या भाषांतील साहित्यही यावर उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लेखकांनी या उपक्रमात सहभागी होऊन, ही ‘रीडिंग वॉल’ अधिक मजबूत करत न्यावी, असे आवाहन ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी केले आहे.

खालील पुस्तके सध्या रीडिंग वॉलवर मोफत उपलब्ध असून, आणखीही अनेक पुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहेत.

सुखांचे सॅशे - प्रसाद शिरगांवकर (https://www.readingwall.com/P/MYSECO)

भटक्याची डायरी - प्रसाद शिरगांवकर (https://www.readingwall.com/P/QYSOCO)

i-बाप - प्रसाद शिरगांवकर (https://www.readingwall.com/P/YYSNCO)

पश्चिमेच्या खिडकीतून - अनिल नेने (https://www.readingwall.com/P/IYWHCN)

आजचा भारत... जगाच्या नजरेतून - अनिल नेने (https://www.readingwall.com/P/BZZKCN)

चैतन्यस्पर्श - सचिन मधुकर परांजपे (https://www.readingwall.com/P/QYWNCN)

द प्रिन्स अँड द पॉपर - मुक्त अनुवाद - डॉ. गजानन केशव केतकर (https://www.readingwall.com/P/IYUGCN)

हृदयसंगम (कवितासंग्रह) - अथर्व ढगे (https://www.readingwall.com/P/DYZLCN)

आय बुक - डॉ. आदित्य श्रीकांत केळकर (डोळ्यांच्या आरोग्याविषयी) (https://www.readingwall.com/P/HYTRCN)

से चीज..! - डॉ. भक्ती दातार (दंत आणि मुख आरोग्य) (https://www.readingwall.com/P/VYTLCO)

रोजची देवपूजा - डॉ. अभय कुलकर्णी (https://www.readingwall.com/P/UYXGCN)

सातमाईंचे रान - आयडा बॅरेटो (कादंबरी)

अवघे हरिमय योगबळे - सुधीर काळे (आध्यात्मिक)

बी पॉझिटिव्ह - सकारात्मक विचारांचा संग्रह
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYSDCO
Similar Posts
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले
प्रसाद शिरगांवकरांच्या तीन पुस्तकांचे २९ फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेली, आगळावेगळा वाचनानुभव देणारी तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात प्रकाशित होणार आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे आहेत. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत असून, प्रसिद्ध लेखक, आयटी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ
प्रसाद शिरगांवकरांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीला; २५ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशनपूर्व सवलत पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांची तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी वाचकांच्या भेटीला येत आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे असून, पुण्यातील ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास या पुस्तकांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language